Sought A Stop To Recruitment : रशियाच्या सैन्यातील आणखी २ भारतियांचा मृत्यू

भारतियांची सैन्यातून सुटका करण्याची भारत सरकारची रशियाकडे मागणी !

नवी देहली – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात रशियाच्या सैन्यात अनुमाने २०० भारतीय नागरिकांची भरती करून घेण्यात आली असून त्यातील २ जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी २ जणांचा मृत्यू झाला होता. याविषयी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ‘भारताने रशियाच्या सैन्याला भारतीय नागरिकांची भरती करू नये. आम्ही भरतीवर बंदी घालण्याची मागणीदेखील केली आहेे, तसेच रशियाच्या सैन्यात भरती झालेल्या भारतियांची लवकर सुटका करून त्यांना मायदेशी परतण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी केली आहे. हे सूत्र रशियाच्या सरकारकडे मांडले आहे’, अशी माहिती दिली.

रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, अलीकडेच मृत झालेल्या २ भारतियांचे मृतदेह त्वरित परत आणण्यासाठी भारत काम करत आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहोत.

संपादकीय भूमिका 

रशियामध्ये यापूर्वी २ भारतियांचा मृत्यू झाला आहे आणि त्या वेळीही भारताने रशियाकडे हीच मागणी केली होती; मात्र रशिया भारताच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे, हेच लक्षात येते. त्यामुळे ‘रशिया आपला खरा मित्र आहे कि आपला वापर करून घेत आहे ?’, याचा विचार केला पाहिजे !