पुणे येथे ट्रकमधून पाठवला जाणारा ४३ लाख रुपयांचा गुटखा पकडला !

एकाला अटक !

प्रतीकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – राज्‍यात गुटखाबंदी असतांनाही शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्‍याची विक्री चालू असल्‍याचे स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या कारवाईवरून समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर ते अहिल्‍यानगर रस्‍त्‍यावर स्‍थानिक गुन्‍हे शाखेने एका ट्रकमधून ८० पोती भरून गुटखा जप्‍त केला. त्‍याची किंमत ४३ लाख रुपये आहे. स्‍थानिक गुन्‍हे शाखेने ट्रक आणि गुटखा असा एकूण ५८ लाख ५१ सहस्र ३२० रुपयांचा माल जप्‍त केला आहे.

‘शहरातून लाखो रुपयांच्‍या गुटख्‍याची वाहतूक होणार आहे’, अशी माहिती पोलिसांना १४ जून या दिवशी मिळाली होती. यावरून विशेष पथकाने त्‍या रात्री ११.४५ वाजण्‍याच्‍या सुमारास भेंडाळा येथे नाकेबंदी करून पुणे येथे जाणार्‍या ट्रकला थांबवले. ट्रकचालक शेख वाहेद शेख मुसा (वय ३० वर्षे ) याने ट्रकमधील मालाविषयी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पडताळणी केली असता ट्रकमध्‍ये गुटख्‍याचा माल आढळून आला. या प्रकरणी शेख वाहेद शेख मुसा याच्‍या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करून त्‍याला अटक केली आहे. (लोकसंख्‍येत अल्‍पसंख्‍य धर्मांध गुन्‍हेगारीत मात्र अग्रेसर ! – संपादक)