महाराष्ट्र सरकार मुसलमानांवर मेहरबान !

याचिकाकर्त्यांने ४ दिवसांची सवलत मागितली, तर सरकारने ५ दिवसांची सवलत दिली !
मुंबई – बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानीपूर्वी करण्यात येणार्या पशूंच्या आरोग्य पडताळणीचे शुल्क २०० वरून २० रुपये करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील महायुती सरकारने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी हिंदूंच्या देवस्थानांची भूमी बळकावणार्या वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी महायुती सरकारने १० कोटी रुपये अर्थसाहाय्य घोषित केले. याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशातच पशूंच्या कुर्बानीवर सवलत देऊन मुसलमानांना खुश करणारा आणखी एक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.
बकरी ईदनिमित्त कुर्बानी द्यावयाच्या पशूंच्या हत्येपूर्वीच्या आरोग्य पडताळणीसाठी देवनार पशूवधगृहात घेण्यात येणारे २०० रुपये शुल्क २० रुपये करावे, यासाठी ‘अल्-कुरेशी ह्युमन वेलफेअर असोशिएशन’ने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली होती. बकरी ईदनिमित्ताने १७ ते १९ जून या कालावधीत शुल्कात कपात करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली होती. यावर न्यायालयाने राज्य सरकारच्या पशूसंवर्धन विभागाकडे हा विषय मांडण्यास सांगितले, तसेच याचिकाकर्त्यांने वेळेत माहिती दिल्यास त्यावर योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश सरकारला दिले होते. राज्य सरकारने याचिकाकर्त्यांची ही मागणी मान्य तर केलीच, तसेच याचिकाकर्त्याने ४ दिवसांची सवलत मागितली असतांना सरकारने त्यामध्ये आणखी १ दिवस सवलत देऊन १७ ते २० जून या कालावधीत पशूंच्या पडताळणीच्या शुल्कात सवलत दिली आहे. बकरी ईदच्या निमित्ताने मुंबईतील देवनार पशूवधगृहामध्ये लाखो पशूंची हत्या केली जाते.
| सार्वजनिक ठिकाणी होणार्या पशूहत्येचा सर्वसामान्यांना त्रास !
बकरी ईदच्या काळात मुंबईमध्ये उघड्यावर, तसेच अवैधरित्या होणार्या पशूहत्येच्या विरोधात शहरातील अनेक नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. नागरी वस्त्यांमध्ये होणार्या पशूहत्या आणि त्यामुळे होणारी दुर्गंधी यांविषयी मुंबईमध्ये ठिकठिकाणी संताप व्यक्त केला जातो. त्यामुळे सरकारने कुर्बानीपूर्व पशूंच्या पडताळणीमध्ये दिलेल्या या सवलतीविषयी मुंबईकरांकडून खेद व्यक्त होण्याची शक्यता आहे. बकरी ईदच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत कुर्बानीसाठी ११४ ठिकाणी अनुमती दिली आहे. बकरी ईदपर्यंत यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. |
Goalpara School Beef Row : आसाममधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांकडून हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस भरवण्याचा प्रयत्न
रुमडामळ, मडगाव येथे मुसलमानाकडून गोरक्षक रेडकर यांच्यावर आक्रमण
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
मंदिरांचे सरकारीकरण टाळण्यासाठी उपाययोजना !