कर्मयोग

‘कर्मयोग, म्हणजे कर्म करता करता होत असलेली ईश्वरप्राप्ती. तीही सुलभतेने होणारी. कर्म हे घडतच असते; परंतु कर्म घडण्यात जो मुद्दामपणा आपण आणत असतो, तोही काढून टाकायचा, म्हणजे आपोआप त्यात सहजता येते. निर्हेतुकतेच्या (निष्काम कर्म) आविष्कारातून आणि निरासक्तीच्या भावनिष्पत्तीतून कर्माला सहजता येते. ती इतकी की, कर्मच अकर्म होते. करून न केल्यासारखे होते. कर्मप्रवृत्तीचा अभाव होतो. अभाव होताच ईश्वरीय भाव निर्माण होतो; कारण पोकळी दिसताच भरून काढणे, हा ईश्वराचा स्वभाव आहे. ईश्वराला त्याच्या स्वभावानुसार कार्य करू देणे हाच ‘कर्मयोग.’

– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)