१. ‘ऑनलाईन’ भक्तीसत्संग चालू असतांना जणू तो ऐकण्यासाठी एक फुलपाखरू भ्रमणभाषजवळ येऊन बसणे
‘१२.१२.२०२३ या दिवशी एक फुलपाखरू घरात आले होते. ते २ दिवस बैठककक्षामध्ये फिरत होते आणि मधेमधे एका जागी बसत होते. १४.१२.२०२३ या दिवशी दुपारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा ‘ऑनलाईन’ भक्तीसत्संग होता. मी भ्रमणभाषवरून भक्तीसत्संग ऐकत असतांना ते फुलपाखरू त्या खोलीत आले आणि त्या भ्रमणभाषच्या अगदी जवळ येऊन बसले. तेव्हा ‘ते फुलपाखरू जणू भक्तीसत्संग ऐकायला बसले आहे’, असे मला वाटले.
२. भक्तीसत्संगाच्या वेळी फुलपाखरू भ्रमणभाषजवळ ध्यान लागल्याप्रमाणे बसणे
भक्तीसत्संग चालू असतांना फुलपाखरू माझ्या शेजारीच बसले होते. मी अधूनमधून पाणी पिण्यासाठी किंवा अन्य काही कारणांनी उठत होते; मात्र ते त्या जागेवरून हललेही नाही. एरव्ही थोडीशी हालचाल झाली, तरी फुलपाखरू लगेच उडून दूर जाते; पण हे फुलपाखरू जणू त्याचे ध्यान लागल्याप्रमाणे बसले होते.
३. भक्तीसत्संग झाल्यानंतर फुलपाखरू २ दिवस खोलीतच बसून रहाणे
भक्तीसत्संग संपल्यावर फुलपाखरू उडून भिंतीवर बसले आणि काही वेळाने ते लादीवर बसले. ‘त्याला भूक लागली असेल’, असा विचार करून माझा भाचा कु. विवान अमित कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८ वर्षे) याने फुलपाखरासाठी एका चमच्यात मध आणून तो त्याच्या तोंडाजवळ ठेवला, तरीही ते हलले नाही. ते ध्यानावस्थेत असल्याप्रमाणे २ दिवस त्या जागेवरून हलले नाही.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चैतन्यमय आवाजामुळे फुलपाखरू ८ दिवस जिवंत रहाणे
तिसर्या दिवशी फुलपाखराने थोडीशी हालचाल केली आणि ते अल्प गतीने थोड्या उंचीवरून उडून बाहेरच्या खोलीत गेले. त्याची हालचाल अल्प झाल्याचे पाहून विवानने फुलपाखरासाठी खेळण्यातील रबरी ठोकळ्यांची पेटी बनवली आणि त्यात त्याला अलगद ठेवले. ‘फुलपाखराच्या मंद हालचालींवरून ते १ – २ दिवस जिवंत राहील’, असे वाटत होते. प्रत्यक्षात ते ५ – ६ दिवस जिवंत राहिले. तेव्हा ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या आवाजातील चैतन्यामुळेच ते एवढे दिवस जिवंत राहिले’, असे मला वाटले.
५. कृतज्ञता
‘सर्व जिवांचा उद्धार करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि भक्तिसत्संगातून सर्व साधक जिवांना चैतन्य देणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या कृपेमुळेच आम्हाला ही अनुभूती घेता आली’, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– अश्विनी अनंत कुलकर्णी, फोंडा, गोवा. (७.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |