लष्करात भरती करण्याच्या प्रकरणी लाच मागितल्याने लेफ्टनंट कर्नलवर पुन्हा एकदा गुन्हा नोंद !

लष्कराच्या नावाला काळीमा फासणारी घटना !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – लष्करात भरती प्रक्रियेत प्रतीक्षा सूचीत असलेल्या एका उमेदवाराकडे २ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील तत्कालीन लेफ्टनंट कर्नल विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा नोंद केला आहे. विकास रायझादा असे लेफ्टनंट कर्नलचे नाव असून त्यांनी निवड झालेल्या उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचेही समोर आले आहे. ग्रुप सीच्या भरती प्रक्रियेतही त्यांनी अपप्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कट रचणे, फसवणूक करणे, तसेच भ्रष्टाचाराच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील तत्कालीन हवालदार सुशांत नाहक, नवीन कुमार यांच्यावर वर्ष २०२१ मध्ये गुन्हा नोंद केला होता. अधिक अन्वेषणानंतर नाहक याने भरती प्रक्रियेत निवड झालेल्या आणि निवड न झालेल्या उमेदवारांकडे पैशाची मागणी केली असल्याचा प्रकारही अन्वेषणात समोर आला आहे.

संपादकीय भूमिका 

  • लष्कराची प्रतिमा मलीन करणार्‍या या अधिकार्‍याला तसेच या प्रकरणामध्ये गुन्हा नोंद झालेल्या इतर आरोपींना सेवेतूनच मुक्त करायला हवे, तसेच त्यांच्याकडून हानीभरपाईही घ्यायला हवी !
  • लष्करामध्ये ज्या ज्या विभागात भ्रष्टाचार शिरला आहे, तो बाहेर आला, तरच लष्कराचे वेगळेपण अबाधित राहील !