१. पावसाळ्यात साहित्य इतरत्र पाठवतांना खोक्यांना प्लास्टिक न लावल्यामुळे साहित्याची खोकी भिजणे
‘पावसाळ्यात अन्यत्र साहित्य पाठवतांना ते प्लास्टिकच्या वेस्टनात बांधून पाठवणे आवश्यक असते. काही वेळा साहित्याच्या खोक्यांना प्लास्टिक लावलेले नसते, तर काही वेळा खोक्यांना फाटलेले प्लास्टिक लावल्याने खोकी भिजतात, असे लक्षात आले आहे. साधकांकडून होणार्या अशा चुकांमुळे खोक्यातील साहित्य खराब होऊन गुरुधनाची मोठ्या प्रमाणात हानी होते.
२. साधकांनो, पावसाळ्यात अन्यत्र साहित्य पाठवतांना पुढील काळजी घ्या !
वरील प्रकारच्या चुका टाळण्यासाठी साहित्य अन्यत्र पाठवतांना ते पाण्यात भिजू नये, चिखलाने खराब होऊ नये, तांत्रिक वस्तू असल्यास पाण्यामुळे ती नादुरुस्त होऊ नये, यासाठी साधकांनी पावसाळ्यात अन्यत्र साहित्य पाठवतांना ते प्लास्टिकच्या वेस्टनात व्यवस्थित बांधावे. साधकांनी साहित्य बांधणीसाठी प्लास्टिक वापरतांना प्रवासात ते फाटणार नाही, याचा विचार करून ते निवडावे. बांधणीसाठी उपयुक्त असे प्लास्टिक कोणत्याही जिल्ह्यांमध्ये असल्यास साधकांनी ते मागणी-पुरवठा विभागात किंवा जवळच्या आश्रमात आवश्यकतेनुसार पाठवावे.’
(३१.५.२०२४)