अकोला – येथे २ तरुण एका तरुणीची छेड काढत असतांना तिने विरोध केल्याने तिच्यावर स्क्रूड्रायव्हरने आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला. या तरुणीसमवेत तिची आईही होती. आईने तरुणाला विरोध केला; परंतु तरुणी मध्ये पडल्याने तरुणांनी तिच्यावर आक्रमण केले. (कायद्याचे भय नसलेल्या या तरुणांना तत्परतेने कठोर शिक्षा झाली, तर तरुणीला न्याय मिळेल ! – संपादक) या आक्रमणानंतर तरुणी जागेवर खाली कोसळली. या तरुणीने आरडाओरडा केला. त्यामुळे पुढील आक्रमण कदाचित टळले. हे सर्व सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रीत झाले आहे. भर बाजारात ही घटना घडली आहे. ही घटना अनेक लोक बघत असल्याचेही यात दिसते. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तरुणी रुग्णालयात उपचार घेत आहे.