
कोल्हापूर – भारतासह अन्य देशांमध्ये आतंकवादाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी भारत सरकारला हवा असलेला आणि आतंकवाद्यांचा आदर्श असणारा डॉ. झाकीर नाईक याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये केली आहेत. महंमद झीशान नावाच्या मुसलमान युवकाने पाठवलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना झाकीर नाईक याने मंदिराच्या कामात सहभागी होणे, हे ‘शिर्क’ म्हणजे इस्लामनुसार महापाप आहे. मंदिर अथवा चर्च यांमध्ये जाण्यापेक्षा सहस्रोंना मारणार्या शस्त्रे बनवणार्या कारखान्यात जाणे चांगले, कोणत्याही मंदिर किंवा चर्च बनवणार्या आस्थापनात काम करणे हे इस्लामनुसार ‘हराम’ आहे. पुष्कळ मोठे महापाप आहे, अशी उत्तरे दिली आहेत. ‘हुडा टी.व्ही.’ नावाच्या यू ट्यूब चॅनलवर झाकीर नाईक याचा हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान करणार्या झाकीर नाईक याच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्वीकारले.

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. सुनील सामंत, ‘महाराज प्रतिष्ठान’चे श्री. निरंजन शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि गौतमेश तोरस्कर, अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अभिजित पाटील, सतीश कोरवी, सचिन पवार, राहुल जानवेकर, सागर रांगोळी, रामभाऊ मेथे उपस्थित होते. झाकीर नाईक हा ‘इस्लामी धर्मोपदेशक’ असल्यामुळे त्याच्या भाषणांतून जगभरातील धर्मांध मुसलमान प्रेरणा घेतात.
या प्रसंगी करण्यात आलेल्या मागण्या
१. अशा प्रकारे वक्तव्ये करून झाकीर नाईक मुसलमानांना हिंदु आणि ख्रिस्ती यांच्या विरोधात भडकावत असून जाणीवपूर्वक धार्मिक तेढ, घृणा, द्वेष, मत्सर आणि शत्रुत्व निर्माण करत आहे. तरी झाकीर नाईक याला भारताच्या स्वाधीन करावे, अथवा मलेशियात त्याच्यावर कठोर कारवाई करावी, यासाठी केंद्र सरकारने मलेशिया सरकारवर दबाव आणावा.
२. ‘संयुक्त राष्ट्र संघा’त झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी मागणी करावी.
३.‘झाकीर नाईक’ आणि ‘इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’ यांचे फेसबूक, एक्स, इन्स्टाग्राम आदी सर्व सामाजिक माध्यमांवरील सर्व अकाऊंट त्वरित बंद करण्यात यावीत.
४. हे सामाजिक माध्यमावरील खाते इतकी वर्षे का बंद करण्यात आले नाही ? याला कोण उत्तरदायी आहे ? त्या व्यक्ती आणि ‘फेसबुक’सारखी आस्थापने यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करावी.
संपादकीय भूमिकावास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदूंवर येऊ नये. आतंकवाद्यांचा आदर्श असणारा झाकीर नाईक फरार आहे. तो बाहेर राहून भारत आणि हिंदु धर्म यांच्या विरोधात गरळ ओकत आहे. त्यामुळे त्याच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणून शिक्षा करण्यासाठी आता सरकारने पावले उचलावीत, असेच हिंदूंना वाटते ! |
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
UP Poster Row : मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ‘हृदयात बाबर, मुखात राम’, असा फलक लावल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते संतप्त !