Indigo Flight Bomb Threat : देहली-वाराणसी ‘इंडिगो’ विमानाला बाँबने उडवण्याची धमकी निघाली खोटी !

प्रवाशांना आपात्कालीन फाटकातून बाहेर काढण्यात आले

नवी देहली – बाँबने उडवून देण्याच्या धमक्यांची सध्या शृंखला चालू झाली आहे. आता देहली विमानतळावर २८ मेच्या सकाळी वाराणसीहून जाणार्‍या ‘इंडिगो’च्या विमानात (६ई२२११) उड्डाण होण्यापूर्वी त्यावर बाँब लिहिलेला ‘टिश्यू पेपर’ सापडला. यानंतर कर्मचार्‍यांनी सर्व प्रवाशांना आपात्कालीन फाटकातून बाहेर काढले, तसेच बाँब निकामी पथकाला पाचारण करण्यात आले. विमानात शोध घेण्यात आला; मात्र अधिकार्‍यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. या प्रकरणाची पुढील चौकशी केली जात आहे.

या महिन्यात देशातील वेगवेगळ्या शहरांतील विमानतळे, शाळा, रुग्णालये यांना बाँबची धमकी देण्यासंदर्भातील ही आठवी घटना आहे. आतापर्यंतच्या सर्व धमक्या खोट्या निघाल्या आहेत.

संपादकीय भूमिका

वारंवार मिळणार्‍या अशा धमक्या जरी खोट्या निघत असल्या, तरी जिहादी आतंकवाद्यांचे जाळे अजूनही देशातून नष्ट झालेले नाही, हे स्पष्ट होते. यावर जिहाद आणि त्यामागील विचारसरणी प्रसृत करणारे सर्व साहित्य देशातून नष्ट करणे आवश्यक !