१. हिंदूंनी मताचा अधिकार जागृतपणे वापरणे आवश्यक !
जेव्हा हिंदूंवर अत्याचार होतात किंवा धर्मांधांकडून हिंदूंची हत्या केली जाते, तेव्हा त्याची मुख्य बातमी होत नाही. त्या वृत्ताला वृत्तपत्राच्या कुठल्या तरी कोपर्यात प्रसिद्धी दिली जाते. आज ‘इलेक्ट्रॉनिक’ माध्यमांचा काळ आहे. त्यातही कितीतरी वृत्तवाहिन्या विदेशी आहेत आणि साम्यवादी विचारसरणीच्या नियंत्रणात आहेत. एका दूरचित्रवाहिनीवर एका पत्रकाराला लोकांनी सांगितले, ‘हिंदूंची संख्या घटत चालली असून मुसलमानांची संख्या वाढत चालली आहे.’ त्यावर त्याने म्हटले, ‘त्यामुळे काय होणार ? मुसलमानांची संख्या जर वाढली, तर काय डोंगर कोसळणार आहे का?’ असे मूर्खासारखे बोलणार्याने स्वतःच विचार करायला हवा. हिंदूंनी देशात राष्ट्रवादी हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे सरकार सत्तेत आणले नसते, तर सर्वाेच्च न्यायालयही निर्णय घेण्यात मागे राहिले असते. ही गोष्ट निश्चितपणे जाणून घ्या की, आपल्याला या मतदानाच्या अधिकाराला अधिक संघटित करावे लागेल.
आज केंद्रात हिंदुत्वनिष्ठ सरकार आहे; परंतु त्यांना वैयक्तिकपणे ३०३ जागाच मिळाल्या आहेत. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशात काँग्रेसचे ४०० हून अधिक खासदार निवडून आले होते. आपण या लोकशाही पद्धतीमध्ये देवतातुल्य धर्माचे अनुयायी आहोत. आज लोक म्हणतात, ‘साहेब आपण केवळ धर्माचे मर्म जाणले पाहिजे.’ मला हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे एक वाक्य फार आवडते. त्यांनी म्हटले आहे, ‘आपल्या शत्रूला आपल्याला चांगले ओळखता आले पाहिजे.’
२. भारतातील धर्मनिरपेक्षता हिंदूंसाठी धोकादायक !
अमेरिका एक ख्रिस्ती देश आहे आणि त्यांचे राष्ट्राध्यक्ष जगातील सर्वांत सामर्थ्यवान समजले जातात. त्यांनी म्हटले, ‘इस्लामिक आतंकवाद संपूर्ण जगभरात पसरला आहे आणि आपल्याला त्याच्याशी लढावे लागेल.’ असे बोलण्याचे धाडस आपल्यात नाही; कारण आपल्या देशात मुसलमानांची लोकसंख्या २५ कोटींहून पुढे गेली आहे. त्यामुळे आम्ही धर्मनिरपेक्षतेची चादर ओढून बंधुत्वाच्या गोष्टी करतो. हा बंधुत्वभाव पसरवू इच्छितो. म. गांधीजींनी ‘यंग इंडिया’मध्ये म्हटले होते, ‘हिंदू हा वृत्तीने मूळचा भित्रा आहे, तर मुसलमान हे वृत्तीने आतंकवादी आहेत. (हिंदू इज कावर्ड बाय नेचर मुस्लीम बाय नेचर इज मिलिटंट’) तर माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की, जर आपले सैन्य शस्त्र न घेता त्यांच्याकडे गेले आणि म्हणू लागले, ‘आम्ही एकमेकांमध्ये समरसता आणू इच्छितो. एकमेकांमध्ये बंधुभाव आणण्याचा विचार आहे’, तर आपले सैनिक तेथे जिवंत राहू शकेल का ?
३. प्रसारमाध्यमे आणि न्यायव्यवस्था यांच्याकडून हिंदु संतांविषयी दुजाभाव
भारतीय पत्रकार सत्यापासून पुष्कळ लांब गेले आहेत. त्यांनी कुराणाचा अभ्यास केला पाहिजे; पण ते आपल्या हिंदु धर्मातील छिद्रे बघण्यासाठीच पुष्कळ उतावीळ झालेले असतात. एखादे मंदिर किंवा संत यांच्याविषयी क्षुल्लक गोष्ट मिळाली, तर त्याविषयी दूरचित्रवाणीवर अनेक दिवस चर्चा होत रहातात. दुसरीकडे ख्रिस्ती किंवा मुसलमान यांच्या विरोधात एखादी घटना घडली, तर ते बातमी दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. मागे एका ननवर बलात्कार केल्याचा बिशपवर आरोप करण्यात आला होता. त्याच्या विरोधात पीडिता न्यायालयातही गेली होती. असे असतांनाही त्याला जामीन मिळाला.
४. धर्मांध घुसखोरांना आश्रय दिल्याचे युरोपमध्ये आतंकवादात वाढ
कुराणविषयी भारतीय पत्रकार बोलायला घाबरतात. समुद्र किनारी एका लहान मुलाचे छायाचित्र जगभरात प्रसारित झाले. त्याच्या मागे एक षड्यंत्र होते. समुद्र किनारी त्याचे छायाचित्र काढायला कोण गेले होते ? संपूर्ण ख्रिस्ती लोकांनी म्हटले, ‘त्यांना आता मानवतावादी दृष्टीकोन आत्मसात करावा लागेल.’ त्यानंतर युरोपीय देशांनी शरणार्थी मुसलमानांना दारे उघडे केली. त्यानंतर संपूर्ण युरोपमध्ये स्थिती फार वाईट झाली आहे. आता तेथील जर्मन, फ्रान्स आदी राष्ट्रे आतंकवादाने ग्रासलेली आहेत. फ्रान्समध्ये ‘चार्ली हेब्दो’ या नियतकालिकाने प्रेषित महंमद यांचे चित्र प्रकाशित केले. त्यानंतर धर्मांधांनी त्या नियतकालिकाच्या कार्यालयावर आक्रमण केले. त्यात १३ पत्रकार मारले गेले. हा इस्लामिक आतंकवाद आहे.
५. इस्लाम धर्म नाही तर एक राजकीय शक्ती !
आपल्याला असे म्हणावे लागेल, ‘इस्लाम हा धर्म नाही. ती एक राजकीय शक्ती आहे, जी संपूर्ण जगावर राज्य करू इच्छिते.’ एका समुहाची गोष्ट आहे. मी कुराण वाचले आहे. मला १० वर्षांपूर्वी कोणत्या तरी असामाजिक विद्वानाने मला ‘सत्यार्थ प्रकाश’ मासिक दिले. त्यापूर्वी विचार करत होतो की, सर्वजण धर्मावलंबी आहेत आणि कुराणही शांतीचे धडे देत असेलच. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘इस्लाम हा धर्म नाही. तो केवळ एक पंथ आहे.’ आर्य समाजाचे प्रवर्तक महर्षि दयानंद यांनी कुराणविषयी सांगितले, ‘हा कोणताही धर्म नाही.’ मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) सकाळी सकाळी अजान देतात आणि त्यात ते ‘अल्लापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही’, असे सांगतात. आपल्या धर्मामध्ये असे कधीच सांगितले जात नाही की, प्रभु श्रीरामापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही. आपण परमपिता परमेश्वर ॐ कारची पूजा करतो.
ब्रह्मांडामध्ये तर हेच सर्वकाही आहे; परंतु आम्ही तर कधीच म्हटले नाही की, आमचे श्रीराम मर्यादापुरुषोत्तम, योगीराज श्रीकृष्ण किंवा हनुमान हे आमचे सर्वांत श्रेष्ठ आहेत. आम्ही कुणावर आघात केले नाही; परंतु त्यांनी सांगितले, ‘अल्लाह सर्वाेच्च आहे आणि अल्लाचा दूत (प्रेषित) नबी पैगंबर तो महंमद आहे.’ ही गोष्ट जो मान्य करत नाही, त्याला ‘काफिर’ म्हटले जाते. ‘काफिराचा नाश झाला पाहिजे, त्याची हत्या करायला पाहिजे’, असे त्यांच्या धर्मग्रंथात म्हटले आहे. जे त्यांच्या लहान मुलांना शिकवतात, ‘तुमच्या गल्लीमध्ये शेजारी रहाणारी व्यक्ती आपला खानदानी शत्रू आहे, त्याने आपल्या पूर्वजांची हत्या केली आहे. त्याला संधी मिळेल, तेव्हा ठार करा.’ आता सांगा, तो बालक मारेकरी नाही का होणार ? ही सत्यस्थिती भारतीय पत्रकार सांगायला सिद्ध नाहीत.
६. ख्रिस्ती आणि इस्लाम यांच्याकडून हिंदु धर्माला लक्ष्य करण्याचा प्रयत्न
कुराण शांतीचा संदेश देते, असे म्हटले जाते. या पृथ्वीवर लॅबेनानपासून जगभरात संपूर्ण हाहाःकार माजला आहे. तेथे कुठे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नरेंद्र मोदी किंवा योगी आदित्यनाथ आहेत. शिया पंथवाले सुन्नीला पाहू शकत नाही, तर सुन्नी शियाला पाहू शकत नाही. अहमदीया यांना तर मुसलमानांनी धर्मबाह्य ठरवून वर्ज्य केले आहे. शियांना मुसलमानांमधून वर्ज्य केले आहे. आपण आपले ज्ञानचक्षू उघडायला पाहिजे. आता डोळे झाकून काम होणार नाही. आज आपल्याला ख्रिस्ती आणि इस्लाम दोघेही जण गिळू पहात आहेत; परंतु ख्रिस्त्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे आता आपण हिंदूंनी सजग राहून सनदशीर मार्गाने त्यांच्याशी लढले पाहिजे.
७. प्रखर हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी यांची हत्या कट्टर धर्मांधांकडूनच
देहलीमध्ये एका पुस्तकात मला सापडले, ‘महंमद साहेब यांचे संदेशवाहक (नबी) होते आणि महंमदांच्या नावाखाली हत्या करण्यात येत आहेत. प्रखर हिंदुत्वनिष्ठ दिवंगत कमलेश तिवारी यांची हत्या त्यामुळेच झाली आहे. ‘महंमद यांच्या मृत्यूनंतर ३ मासांच्या आत त्यांची कन्या फातिमाची हत्या त्यांच्या घरात घुसून कुणी केली होती ? ‘अल्लाहू अकबर’ची घोषणा देऊन त्यांच्या पोटच्या मुलीची हत्या केली गेली. त्यांचे जे जावई होते त्यांना ते ‘हजरत अली’ म्हणतात. महंमदाचे चुलत भाऊही होते. ते तालीबचे पुत्र होते. त्यांनी मरेपर्यंत इस्लामला स्वीकारले नव्हते. ते शैवभक्त होते. मला आता एक ‘अंडरस्टँडिंग ऑफ महंमद’ एक पुष्कळ चांगले पुस्तक मिळाले आहे. अमेरिकी विद्वान डॉ. अली सिन्हा यांनी ते लिहिलेले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘हजरतसाहेब महंमदाचे चुलत भाऊ होते आणि महंमदाचे जावई होते. जेव्हा पहाटे ४ वाजता नमाज पठण केला जातो. त्या नमाजाच्या वेळी ते खाली वाकलेले असतांना त्यांची हत्या करण्यात आली.’
९. हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षणासह संघटनाकडे लक्ष देणे आवश्यक !
आपण हिंदूंनी स्वतःच्या संरक्षणासाठी जागरूक राहिले पाहिजे. आपण कुणाला मारण्यासाठी नाही, तर आपल्या आत्मरक्षणासाठी पुष्कळ काही करू शकतो. स्वसंरक्षणासह हिंदूंचे संघटन महत्त्वाचे आहे. मंदिरांमध्ये आखाडा कायम असावा. पूर्वी आखाड्याचा अर्थ हनुमान दल असायचा, ज्यामध्ये आमच्या मुलांना तलवार बांधत होते. याद्वारेही हिंदूंना स्वसंरक्षण शिकवले जात होते.’
– श्री. अशोक लोहिया, ज्येष्ठ पत्रकार, दैनिक ‘भास्कर’, गोरखपूर, उत्तरप्रदेश.
हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव५ वर्षांपूर्वी मला काही मित्र आग्रहाने गोव्याला घेऊन गेले होते. त्यांनी आमच्यासाठी समुद्रकिनार्यावरील एक हॉटेल निवडले होते. मी तेथे एका टॅक्सीवाल्याला विचारले, ‘‘भाऊ, येथे दुर्गामंदिर आहे ना, मला तेथे जायचे आहे’’; परंतु त्याने मला मंदिरात न नेता चर्चमध्ये नेले. तेथे गया येथील एक हिंदु नवविवाहित जोडपे मेणबत्ती लावतांना मला दिसले. तेथे मेणबत्ती विकणार्या हिंदु महिलाही मला मेणबत्ती घेण्याचा आग्रह करत होत्या; परंतु त्यांना नकार दिला. ३-४ मासांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्या नवविवाहित जोडप्यातील मुलीला रागवून मी म्हटले, ‘तुझ्याकडे कोणत्या देवतांची न्यूनता आहेत; म्हणून तू येथे येऊन मेणबत्ती लावत आहेस ?’ ती म्हणाली, ‘‘आमच्यासह आलेले लोक आम्हाला येथे घेऊन आले.’’ त्या वेळी मी दुर्गा मंदिरच नाही, तर तेथील इतर मंदिरे आणि अन्य एका आश्रमालाही भेट दिली. यावरून हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाचा किती अभाव आहे, हे लक्षात आले. याउलट इस्लाममध्ये शिकवले जाते की, रमजानच्या मासात एक मास जो त्यांचा असतो, ते चांद्रवर्ष असते. ते प्रत्येक वेळी पालटत जाते. कधी थंडीच्या दिवसात येतो, कधी पावसाळ्यात येतो, कधी उन्हाळ्यात येतो. त्या सायंकाळी ते भोजन करतात आणि ४ वाजता एकमेकांना देतात आणि पाणी पितात. त्यानंतर थुंकी गिळणेही पाप समजले जाते. त्यामुळे मुसलमान त्यांच्या पंथासाठी कट्टर होतात. – श्री. अशोक लोहिया |