पिंपरी- चिंचवड (पुणे) – येथील काही भागांत वादळी वार्यासह पाऊस झाला असून मोशी येथे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही किंवा कुणीही घायाळ झालेले नाही. रस्त्याच्या कडेला असलेले लोखंडी होर्डिंग सुदैवाने रस्त्यावर पडले नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अद्याप हे होर्डिंग अधिकृत आहे कि अनधिकृत हे समजू शकले नाही. होर्डिंगखाली पार्क केलेल्या दुचाकी आणि टेंपो यांची हानी झाली आहे.
नुकतेच मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झालेला आहे. या घटनेनंतर होर्डिंगचा विषय समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही अनधिकृत होर्डिंग्जचे संरचनात्मक परीक्षण करण्याचे काम चालू आहे.