नवी देहली – बंगालमध्ये अचानक झालेल्या वादळी पावसामुळे राज्यातील ३ जिल्ह्यांमध्ये वीज पडून १३ जणांचा मृत्यू झाला. यांत मालदा येथे ११, तर मुर्शिदाबाद आणि जलपाईगुडी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे. मालदाचे जिल्हादंडाधिकारी नितीन सिंघानिया म्हणाले की, प्रशासन सर्व मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये आणि अंत्यसंस्कारांसाठी २ सहस्र रुपये देणार आहे.
West Bengal Storm: 13 people die due to lightning in Bengal!
Possibility of heat wave in 11 states including Maharashtra! pic.twitter.com/otpbLFVV4D
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 17, 2024
महाराष्ट्रासह ११ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता !
दुसरीकडे पंजाब, हरियाणा, देहली, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा, गुजरात आणि महाराष्ट्र येथे उष्णतेची लाट निर्माण होण्याची चेतावणी देण्यात आली आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यासह २४ राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.