नरेंद्र मोदी यांना भारतीय मुसलमानांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही ! – जमाल सिद्दीकी, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी

नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांना विदेशातील मुसलमान देश आणि तेथील मुसलमानांचे प्रेम अन् विश्वास मिळालेला असतांना भारतीय मुसलमान मात्र भाजप आणि मोदी यांच्यापासून फटकून रहातात. मोदी यांना भारतीय मुसलमानांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, अशी रोखठोक भूमिका भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी एका दैनिकाच्या प्रतिनिधीशी बोलतांना मांडली.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार मुसलमानांमधील मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल जातींच्या कल्याणाच्या अनेक योजनांची कार्यवाही केली जात आहे. देशभरातील ६५ मुसलमानबहुल लोकसभा मतदारसंघांत ३ लाख २५ सहस्र मुसलमान ‘मोदी मित्र’ मोदींसह केंद्राच्या मुसलमान कल्याण योजनांचा प्रचार करत आहे. असे असतांनाही मुसलमान समाज मात्र काँग्रेससह इंडी आघाडीच्या अपप्रचाराला भूलून भाजपपासून फटकून रहात आहेत.