‘चांगली वेळ, चांगली व्यक्ती आणि चांगले कार्य यांची वाट बघू नका. आता जी वेळ तुमच्या हातात आहे, तीच चांगली वेळ आहे. वर्तमान स्थितीत आपण जे कार्य करता, ते तत्परतेने आणि उत्तम प्रकारे करा. ‘ज्या व्यक्तीला भेटता तिच्या हृदयात ईश्वर आहे’, असे समजूनच व्यवहार करा. चांगली व्यक्ती ती की, जी तुमच्यासमोर आहे. चांगले काम तेच आहे, जे शास्त्रसंमत आहे आणि आता आपल्या हातात आहे.’
(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)