OTT platform ‘Hari Om’ : देशातील पहिला पौराणिक ओटीटी ‘हरि ॐ’ चालू होणार !

(टीप: ओटीटी म्हणजे ‘ओव्हर द टॉप’. याचा वापर करून इंटरनेटच्या माध्यमातून विविध कार्यक्रम थेट लोकांपर्यंत पोचवता येतात)

उल्लू अ‍ॅपचे प्रमुख विभू अग्रवाल

नवी देहली – ‘उल्लू’ नावाचे ओटीटी आस्थापनाने भारतात पहिले पौराणिक ओटीटी अ‍ॅप आणण्याची घोषणा केली आहे. उल्लू अ‍ॅपचे प्रमुख विभू अग्रवाल यांनी सांगितले की, या अ‍ॅपचे नाव ‘हरि ॐ’ असून ते जून २०२४ मध्ये कार्यान्वित करण्यात येईल. यामध्ये २० पेक्षा अधिक पौराणिक गोष्टींचा समावेश असणार आहे. या अ‍ॅपद्वारे ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात भजने पहाता अन् ऐकता येणार आहेत.

‘उल्लू डिजिटल’ आस्थापन त्याचा ‘आयपीओ’ आणण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. यासाठी आस्थापनाने आवश्यक कागदपत्रे बाजार नियामक मंडळाकडे (‘सेबी’कडे) सादर केली आहेत. या माध्यमातून आस्थापनाला १३५ ते १५० कोटी रुपये उभे करायचे आहेत. अनुमाने ६२.६ लाख नवीन समभाग बाजारात आणणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

आयपीओ म्हणजे ‘इनिशियल पब्लिक ऑफरिंग्ज.’ एखाद्या खासगी आस्थापनाला सार्वजनिक आस्थापनामध्ये रूपांतर करण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाते. यासाठी आस्थापन समभाग प्रसारित करतात. सार्वजनिक रूपाने समभाग प्रसारित केल्यामुळे आस्थापनाला भांडवल प्राप्त होते आणि सामान्य जनतेला अशा आस्थापनेतील गुंतवणुकीवर व्याज मिळते.