दर्ग्यात येणार्या अनेक महिलांवर ‘जियारत’च्या (तीर्थयात्रेच्या) नावावर बलात्कार केल्याचा आरोप !

बदायूं (उत्तरप्रदेश) – येथील ‘बडे सरकार दर्ग्या’ला भेट देणार्या एका विधवेवर दर्गा संकुलातील राहत नावाच्या दुकानदाराने बलात्कार केला. पीडित महिला तिच्या मुलीसह दर्ग्याला भेट देण्यासाठी आली होती. बलात्कार केल्यानंतर राहत याने महिलेला तोंड उघडल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. दर्गा संकुलात राहतचे चादर आणि सिन्नी (मिठाई अर्पण) यांचे दुकान आहे. त्याच्यावर उपचारांच्या नावाखाली प्रतिदिन नवनवीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पीडितेची तक्रार प्रविष्ट करून घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पीडिता विधवा असून ती मूळ बिजनौर जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या एक वर्षापासून ती मुलीसह बदायूं येथील या दर्ग्यात नियमित येत असत. तक्रारीत तिने म्हटले आहे की, अनुमाने १५ दिवसांपूर्वी राहतने पीडितेला गळ घालून त्याच्या खोलीत नेले. येथे त्याने पीडितेवर बलात्कार केला. पीडितेने राहतला विरोध केला असता त्याने तिला मारहाण आणि शिवीगाळ केली. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला असता तिच्या तोंडात कापड कोंबले. बलात्कारानंतर राहतने पीडितेला धमकी दिली की, भविष्यात तू माझी आज्ञा पाळली नाहीस, तर मी तुला जिवे मारीन. राहतकडून जिवाला धोका असल्याचेही पीडितेने सांगितले.
बलात्कारी राहत पोलिसांना उघडपणे पैसे देत होता ! – पीडितेचा तक्रारीत उल्लेखविशेष म्हणजे राहत हा उघडपणे पोलिसांना पैसे देतो, असे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. महिलेने केलेल्या या आरोपासंदर्भात बदायूंचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अमित किशोर श्रीवास्तव यांच्याशी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने संपर्क साधला. या वेळी श्रीवास्तव म्हणाले की, महिलेच्या या आरोपाचे अन्वेषण केले जात आहे. यामध्ये तथ्य आढळल्यास आम्ही योग्य ती कारवाई करू. |
संपादकीय भूमिकाकुणी जर अशांना शरियतनुसार भूमीत खोल खड्डा खणूरून त्यांना कंबरेपर्यंत पुरून दगडांनी ठेचून ठार मारण्याची मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !
इंधन बचत करा आणि सोने खरेदी मर्यादित ठेवा ! : Narendra Modi