|

गोरखपूर (उत्तरप्रदेश) – आझमगड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या २० वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सहजनवा पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा यांच्या पथकाने संत कबीर नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ताहिर अली याला अटक केली. उजव्या पायात गोळी लागल्याने ताहिरला स्थानिक चिकित्सा महाविद्यालयात भर्ती करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, आझमगडमधील जेयानपूर भागात रहाणारी पीडिता २ मेच्या सकाळी रागाच्या भरात घरातून निघून गेली होती. कुटुंबीय तिचा शोध घेत असतांना वाटेत मुलीला ताहिर अली भेटला. नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने ताहिरने मुलीला बसमध्ये बसवून गोरखपूर येथे आणले. रात्रीच्या वेळी तिला नशेचे औषध पाजून त्याने आणि त्याच्या मित्राने तिला जवळच्या जंगलात नेले अन् तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दुसर्या दिवशी सकाळी पीडितेने जवळच्या गावात जाऊन लोकांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध चालू केला.
ताहिर अली सहजनवा परिसरात असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याला घेरले. तेव्हा ताहिरने त्यांच्यावर गोळीबार केला आणि पळून जाऊ लागला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याच्या उजव्या पायाला गोळी लागली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. दुसर्या बलात्कार्याचा शोध घेतला जात आहे.
संपादकीय भूमिकादेशात अल्पसंख्य असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! समान नागरी कायद्याला विरोध करणार्यांपैकी कुणी अशांना शरीयत कायद्यानुसार कंबरेपर्यंत खड्ड्यात गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्याची मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |
छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
Ayodhya RamMandir Theft Row : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ५ आरोपींची घरे जवळजवळ असल्याचे उघड
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !