राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या तुर्कीये दौर्यानंतर आता तुर्कीयेची युद्धनौका मालदीवमध्ये पोचली !
माले (मालदीव) – भारतद्वेष्टे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू हे मालदीवला भारतापासून आणखी दूर घेऊन चालेले आहेत. चीनधार्जिणे असलेले मुइज्जू यांनी आता भारताला पाण्यात पहाणार्या तुर्कीयेशीही हातमिळवणी केली आहे. त्यांनी नुकताच तुर्कीयेचा दौरा केला. या वेळी मुइज्जू आणि तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांच्यात चर्चा झाली अन् विविध करारही झाले. यासह मालदीवने तुर्कीयेकडून ड्रोनही खरेदी केले आहेत. अलीकडेच तुर्कीये नौदलाची एक युद्धनौकाही मालदीवमध्ये पोचली आहे. ती मालदीवला सदिच्छा भेटीसाठी आल्याचा दावा मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने केला आहे.
Maldives Turkey Relations : मालदीवची चीननंतर आता भारतद्वेष्ट्या तुर्कीयेशी हातमिळवणी !
राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या तुर्कीये दौर्यानंतर आता तुर्कीयेची युद्धनौका मालदीवमध्ये पोचली !
वाचा :https://t.co/wr6kJAuEBy
एवढ्याशा मालदीवची शक्ती वाढण्याआधीच भारताने त्याला स्वत:च्या… pic.twitter.com/PZtY8INvvb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 3, 2024
अधिकार्याने सांगितले की, भेटीमुळे तुर्कीये-मालदीव यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील. मालदीवच्या प्रादेशिक पाण्याचे निरीक्षण करण्यासाठी सरकारने तुर्कीयेकडून ड्रोन खरेदी करण्यासाठी ३.७ कोटी डॉलरपेक्षा अधिक (३१ कोटी रुपयांहून अधिक) खर्च केला आहे.
संपादकीय भूमिकाएवढ्याशा मालदीवची शक्ती वाढण्याआधीच भारताने त्याला स्वत:च्या कह्यात घेतले पाहिजे, अन्यथा पुढे शत्रूराष्ट्रांच्या साहाय्याने तो भारताला एक नवी डोकेदुखी म्हणून किंवा सामरिकदृष्ट्या एक नवी युद्धभूमी म्हणून उदयास येईल आणि त्याद्वारे चीन भारताला शह देईल ! |