UN On Protest In US : अमेरिकेकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन ! – संयुक्त राष्ट्रे

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांना अटक केल्याचे प्रकरण

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन

न्यूयॉर्क – पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ अमेरिकन विद्यापिठांमध्ये होणार्‍या  निदर्शनांमुळे विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या अटकेचे सूत्र संयुक्त राष्ट्रांत पोचले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाचे उच्चायुक्त वोल्कर तुर्क यांनी विद्यार्थ्यांच्या अटकेविषयी अप्रसन्नता व्यक्त करत अमेरिकेकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. अमेरिकेत विद्यापीठ प्रशासनाने काळजीपूर्वक काम केले पाहिजे; कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करणेदेखील महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. न्यूयॉर्क पोलिसांनी नुकतेच कोलंबिया विद्यापिठात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना अटक केली होती.

संपादकीय भूमिका

एरव्ही भारताकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कथित उल्लंघन होत असल्याची ओरड करणार्‍या अमेरिकेचे हे आहे खरे स्वरूप ! आता भारताने अमेरिकेसमोर आरसा धरला पाहिजे !