
पुणे – पत्नीला मारहाणीच्या गुन्ह्यात १२ वर्षांपासून पसार असलेल्या रहिम उपाख्य वहिम पटेल या गुन्हेगारास शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बारडोली (गुजरात) येथून अटक केली आहे. वानवडी पोलीस ठाण्यात प्रविष्ट असलेल्या गुन्ह्यातील पसार झालेला आरोपी वहिम पटेल याला अटक वॉरंट जारी केले होते; परंतु त्याचा ठावठिकाणा न लागल्याने न्यायालयाने त्यास ‘पसार’ घोषित केले होते. आरोपी गेल्या १२ वर्षांपासून स्वत:च्या नावात पालट करून गुजरामधील बारडोली परिसरात रहात असल्याची माहिती पोलीस हवालदार राजस शेख यांना मिळाली. त्यावरून कारवाई करत आरोपीला कह्यात घेण्यात आले. (१२ वर्षे गुन्हेगार मोकाट रहातो, ही पोलिसांची अकार्यक्षमता नव्हे का ? – संपादक)
छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !
रेशन माफिया कलीम कुरेशी टोळीवर ‘मकोका’
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
Ayodhya RamMandir Theft Row : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ५ आरोपींची घरे जवळजवळ असल्याचे उघड