नंदुरबार – मूळचा जळगाव येथील आणि सध्या गुजरातमधील वडोदरा येथे रहात असलेल्या राहील उपाख्य महंमद फारुख शेख याला नंदुबार येथे दीड लाख रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्यांसह अटक करण्यात आली. सैन्यातील मेजर पदावरील अधिकार्याचा गणवेश त्याने घातला होता.
नंदुरबार येथील पोलिसांच्या वाहन तपासणीमध्ये वाहतूककोंडी झाली होती, तेव्हा सैन्य अधिकार्याच्या गणवेशातील महंमद शेख आरेरावी करून पोलिसांवर ओरडू लागला. आरंभी हवालदारही त्याच्या गणवेशामुळे त्याला ‘मेजर’ समजला आणि त्याने त्याला ‘सॅल्यूट’ केला; परंतु पोलिसांनी त्याची चौकशी चालू केली, तेव्हा त्याचा खोटारडेपणा उघड झाला. पोलिसांनी त्याच्या गाडीतील अवैध मद्याच्या बाटल्यांविषयी विचारले तेव्हाही त्याने सैन्य अधिकारी असल्याचे सांगितले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याचे ओळखपत्र पाहिले असता, ते नकली असल्याचे लक्षात आले आणि पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांना त्याच्या घराच्या झडतीत ३ लाख ६७ सहस्र रुपयांचे विविध प्रकारचे अवैध मद्य, रोकड आणि आणखी एक सैन्याचा गणवेश मिळाला. सैन्यअधिकार्याचा गणवेश घालून तो महाराष्ट्रातून मद्य घेऊन अवैधपणे तो नेहमी गुजरातमध्ये जात असे. सीमा ओलांडतांना या वेळी तो पकडला गेला. त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून ‘आतापर्यंत तोतया मेजर बनून त्याने काय काय केले ?’, याची पोलीस चौकशी करत आहेत.
यापूर्वी शाहिदा हिला माजी सैन्यअधिकारी असल्याचे सांगून विवाहाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून त्याने तिच्याशी निकाह केला आहे.
संपादकीय भूमिकासर्व प्रकारच्या गुन्हेगारीत बहुसंख्य असणारे अल्पसंख्यांक ! सैन्यअधिकारी असल्याचे भासवून गुन्हे करण्याचे धैर्य करणारे धर्मांध देशासाठी घातकच होत ! |