सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे नेहमीच्या तुलनेत अधिक उंच आणि विराट रूपात दर्शन होणे

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जात असतांना मला परात्पर गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) त्यांच्या खोलीच्या बाहेर दर्शन झाले. मला त्यांच्याकडे पहाता क्षणी ते नेहमीच्या तुलनेत ‘अधिक उंच आणि विराट’ असे दिसले.

श्री. दीप संतोष पाटणे

त्या वेळी त्यांच्या समवेत २ साधक होते. ते त्यांच्या समोर फारच लहान दिसत होते. तेव्हा ‘परात्पर गुरुदेव एवढे उंच कसे दिसत आहेत ?’, असा मला प्रश्न पडला. ‘मला भास झाला असेल’, या विचाराने त्याचे उत्तर जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला नाही; परंतु ‘ते दृश्य अद्भुत होते आणि परात्पर गुरुदेवच सर्वशक्तीमान आहेत, ही प्रचीती देणारे होते’, असे मला वाटले. – श्री. दीप संतोष पाटणे (वय २२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक