|
बालासोर (ओडिशा) – येथे १४ एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीपूर्वी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक करण्यात आली. दगडफेकीनंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात ४ जण घायाळ झाले आहेत. पोलिसांच्या वाहनांचीही हानी झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेमुना भागात ही घटना घडली. गेल्या वर्षीही येथे मिरवणुकीवर अशाच प्रकारचे आक्रमण झाले होते.
मिरवणूक गणीपूर गावातून कनक दुर्गा मंदिराकडे निघाली होती. रेमुना येथे अचानक मिरवणुकीवर दगडफेक चालू झाली. त्यामुळे येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी होऊन घटनास्थळी असलेल्या संपत्तीची हानी झाली. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोचले असता धर्मांधांनी त्यांच्यावरही दगडफेक केली. यात पोलीस अधीक्षक सागरिका नाथ यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. याखेरीज एका पोलिसाचा भ्रमणभाष संच तोडण्यात आला.
ओडिशाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) संजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, मिरवणुकीतील संगीताचा आवाज अल्प करण्यावरून वाद चालू झाला.
संपादकीय भूमिका
|