१. नरसोबाच्या वाडीहून आणलेल्या पादुका ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याच पादुका आहेत’, असा भाव ठेवून त्यांची देवघरात स्थापना करणे : ‘१७.३.२०२१ या दिवशी मी देवघरात ठेवण्यासाठी नरसोबाच्या वाडीहून पादुका आणल्या. नंतर मी त्या एका ताम्हणात ठेवून त्यांची स्थापना केली. त्या वेळी मी ‘त्या पादुका परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याच आहेत’, असा भाव ठेवला.
२. पादुकांची स्थापना झाल्यापासून परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे : ‘या पादुकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांचे या ठिकाणी अस्तित्व आहे’, असे मला जाणवले. मी कुठेही गेलो, तरी ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेतच आहेत’, असे मला वाटते.
३. २८.३.२०२१ या दिवशी देवाची पूजा करतांना माझ्या लहान मुलीने ताम्हणातील पादुका उचलल्यावर ताम्हणामध्ये पादुकांचा आकार स्पष्टपणे उमटलेला दिसला.’
– श्री. देवानंद हडकर, डोंबिवली (प.), ठाणे.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |