‘वर्षाच्या प्रारंभीच त्या वर्षात घडणार्या बर्या-वाईट घडामोडींविषयी माहिती कळल्यास त्याप्रमाणे उपाययोजना करून आधीच तरतूद करून ठेवणे सोपे जाते. हाच वर्षफल ऐकण्याचा खरा लाभ असतो. म्हणून पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकायचे असते. याची काही उदाहरणे पाहू.

१. पाऊस लवकर चालू होणार असेल, तर त्या बेताने शेताची मशागत अगोदर करून ठेवता येते.
२. पावसात खंड पडणार असेल किंवा पावसाचे प्रमाण न्यून असेल, तर अशा वेळी विहिरी वगैरेंचा उपयोग व्हावा म्हणून लागणारे पाट, तळी वगैरे सर्व नीट करून ठेवता येते.
३. दुष्काळ पडणार असेल, तर धान्य आणि वैरण यांची काटकसर करून किंवा ज्या देशांत सुबत्ता होणार किंवा झालेली असेल, तेथून धान्य, वैरण आणून साठा करावा आणि येणार्या अडचणीच्या काळाची तजवीज करून ठेवता येते.
४. कोणती पिके होण्याचा संभव आहे, ते जाणून त्याप्रमाणे बियाणे, खत वगैरे आणून ठेवता येते.’
धर्म आणि संस्कार यांची महती अन् हिंदु पालकांचे दायित्व
संस्कारक्षम पालकत्व कसे असावे ?
भ्रमणभाषच्या विळख्यात अडकलेली पिढी !
संस्कार, आरोग्य आणि राष्ट्रनिर्मिती : काळाची आवश्यकता !
मुलांच्या जीवनशैलीत सकारात्मक पालट होण्यासाठी ‘बालसंस्कार’ हे एकमेव प्रभावी माध्यम आहे !
‘एकल अभियाना’च्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात परिवर्तन !