५ वर्षांत केलेल्या कामांची माहिती मागितली !
अमरोहा (उत्तरप्रदेश) – येथे काँग्रेसचे खासदार दानिश अली ५ एप्रिलला संध्याकाळी नमाजपठणासाठी जात असतांना मुसलमानांच्या जमावाने त्यांच्या ताफ्याला घेरले आणि त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. या वेळी जमावाने दानिश अली यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. संतप्त जमावाने दानिश अली यांच्याकडे गेल्या ५ वर्षांतील कामगिरी, विशेषत: नौगाव सादात या शहरात केलेल्या कामाबद्दल उत्तरे मागितली.
दानिश अली याआधी बहुजन समाज पक्षाचे खासदार होते; परंतु अलीकडेच काँग्रेस पक्षाने त्यांना अमरोहा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले आहे. काँग्रेसचे तिकीट मिळाल्याने स्थानिक मुसलमान संतप्त झाले आणि त्यांनी त्यांच्या विरोधात गदारोळ केला. आंदोलकांचा समाजवादी पक्षाशी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे.