Sonam Wangchuk Leh:सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक ७ एप्रिलला लेह येथे काढणार मोर्चा !

चीनने लडाखमधील भारताची ४ सहस्र चौरस कि.मी. भूमी बळकावल्याचा दावा !

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक

लेह (लडाख) – लडाखमध्ये चीनकडून करण्यात आलेली घुसखोरी अधोरेखित करण्यासाठी आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेशातील वास्तव समोर आणण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक ७ एप्रिल या दिवशी लेहमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या बाजूच्या भागात ‘पश्मिना मार्च’ (मोर्चा) काढणार आहेत. यात सहस्रो लोक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेऊन लेहमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

यासह तेथे इंटरनेट बंद करण्याचाही आदेश देण्यात आला आहे. वांगचुक म्हणाले की, चीनने येथील भारताची अनुमाने ४ सहस्र चौरस कि.मी. कुरण भूमी बळकावली आहे. पश्मिनी मेंढपाळ मोर्चात सहभागी होतील, ते चीनने बळकावलेले कुरण पूर्वी कुठे होते आणि आज कुठे आहे ? हे सांगतील.


यापूर्वी वांगचुक यांनी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि अधिकार देण्यासाठी  २१ दिवस उपोषण केले होते. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे.