NGOs Violating FCRA : ‘फेरा’ कायद्याचे उल्लंघन करणार्‍या ५ स्वयंसेवी संस्थांची नोंदणी रहित

(‘फेरा’ म्हणजे परकीय योगदान नियमन कायदा)

FCRA चे उल्लंघन करणाऱ्या स्वयंसेवी संस्था (NGOs)

नवी देहली – ‘परकीय योगदान नियमन कायद्याच्या (‘फेरा’च्या) विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाने ५ नामांकित स्वयंसेवी संस्थांची नोंदणी रहित केली आहे. यामुळे आता या या स्वयंसेवी संस्थांना परदेशातून पैसे घेता येणार नाहीत आणि त्यांच्याकडे सध्या असलेला पैसाही वापरता येणार नाही. ‘व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशन ऑफ इंडिया’, ‘सीएन्आय सिनोडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस’, ‘इंडो-ग्लोबल सोशल सर्व्हिस सोसायटी’, ‘चर्च ऑक्झिलरी फॉर सोशल ऍक्शन आणि इव्हँजेलिकल फेलोशिप ऑफ इंडिया’ अशी या ५ संस्थांची नावे आहेत. या प्रकरणी अद्याप यापैकी एकाही संस्थेने प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.