जयपूर (राजस्थान) – येथील भट्टा बस्ती भागातील मंदिरात मांसाचे तुकडे फेकल्याची घटना समोर आली आहे. सदर प्रकारानंतर स्थानिक हिंदूंनी संघटित होऊन घडलेल्या प्रकाराचा निषेध केला आहे. मंदिरात मांसाचे तुकडे फेकणार्या धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले सर्व ३ जण अल्पवयीन मुले आहेत.
मंदिरात मांसाचे तुकडे फेकण्याचे कारण म्हणजे धर्मांधांना मंदिरात येणार्या भाविकांना बेशुद्ध करण्याचा कट होता. ही घटना २९ मार्च या दिवशी घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी येथील सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. यात ३ अल्पवयीन मुले दिसून आली. या तिघांची ओळख पटवून त्यांना कह्यात घेण्यात आले. चौकशीमध्ये या अल्पवयीन मुलांनी सांगितले की, त्यांनी सामाजिक माध्यमांवर एक व्हिडिओ पाहिला होता. ज्यात मंदिरात मांस फेकल्यामुळे हिंदू बेशुद्ध झाल्याचे दाखवण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी हिंदूंवर मांस फेकले.
संपादकीय भूमिकाकेवळ धर्मांधच नव्हे, तर त्यांची लहान मुलेही हिंदूंच्या विरोधात अशा कृती करत आहेत. यावरून त्यांना कशा प्रकारचे शिक्षण आणि त्यांच्यावर कशा प्रकारचे संस्कार केले जातात, हे लक्षात येते ! |