धर्मांतर केल्यास प्रतिमहा ५० सहस्र रुपये देण्याचे दाखवण्यात आले होते आमीष !
कानपूर (उत्तरप्रदेश) – येथे काही हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी त्यांना २ बसमध्ये बसवून उन्नाव (उत्तरप्रदेश) येथील चर्चमध्ये नेण्यात येत होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी बसगाड्या थांबवून या प्रकरणी २ जणांना अटक केली. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. ज्यांचे धर्मांतर होणार होते, ते सर्व गरीब कुटुंबातील होते. धर्मांतर करण्यासाठी प्रत्येक हिंदूला प्रतिमहा ५० सहस्र देण्याचे आमीष दाखवण्यात आले होते. त्यामुळेच ते धर्मांतरासाठी सिद्ध झाले होते.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा अस्तित्वात असूनही धर्मांध ख्रिस्ती हिंदूंचे धर्मांतर करण्यास धजावतात, यावरून त्यांचा उद्दामपणा दिसून येतो. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! |

हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !