खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर हत्येच्या प्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे विधान !
ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या भूमीत आमच्या एका नागरिकाची हत्या होणे, ही गंभीर गोष्ट आहे. कॅनडा सरकार या प्रकरणाचे निष्पक्ष आणि योग्य अन्वेषण करत आहे. कायद्याच्या राज्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. आम्ही भारत सरकारसमवेत एकत्रितपणे अन्वेषण चालू ठेवू आणि प्रकरणाच्या खोलात जाऊ. भविष्यात कोणताही नागरिक परकीय हस्तक्षेपास बळी पडणार नाही, याचीही आम्ही काळजी घेऊ, असे विधान कॅनडाचे पतंप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केले आहे. ट्रुडो यांना ‘हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या अन्वेषणात भारताचे सहकार्य कसे चालले आहे ? भारताने कॅनडाला आधी स्वतःचा अन्वेषण पूर्ण करण्यास सांगितले होते ?’ असे पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.