|
जळगाव, २९ मार्च (वार्ता.) – जिल्ह्यातील शिरसोली येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक वराडे गल्ली येथील मशिदीसमोरून जात असतांना येथील ३५ ते ४० धर्मांधांनी अचानक मिरवणुकीवर दगडफेक केली. या वेळी तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचार्यासह ६ हिंदुत्वनिष्ठ घायाळ झाले आहेत. २८ मार्च या दिवशी रात्री ८ वाजता ही घटना घडली. दगडफेकीत वाहनांचीही मोठी हानी झाली आहे. रस्त्यावर दगड आणि विटा यांचा खच पडला होता.
होमगार्ड पंकज सापकर यांनी एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात धर्मांधांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी ३३ धर्मांधांवर गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी २० ते २५ संशयितांना कह्यात घेऊन त्यांना जळगावला नेले. काहींना कह्यात घेण्याचे काम चालू होते.
१. या वेळी धर्मांध मेहमुद समसोद्दीन पिंजारी याने होमगार्ड पंकज यांच्या कपाळावर दगड मारून त्यांना घायाळ केले, तसेच त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर पोलीस कर्मचारी किरण जोशी यांनी होमगार्ड पंकज यांच्यासह ४-५ जणांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती केेले.
२. जळगाव एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे दंगल नियंत्रक पथक शिरसोली गावात तळ ठोकून आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
धर्मांधांचा पूर्वनियोजित कट !पोलिसांनी धर्मांधांच्या घरांची झडती घेतली असता त्यांना मोठ्या प्रमाणात दगड आणि विटा आढळून आल्या. ‘शिवजयंतीनिमित्त मिरवणूक वराडे गल्ली येथील मशिदीजवळ आल्यानंतर त्यावर दगडफेक करायची’, असे पूर्वनियोजन करून त्यांनी सिद्धता केली होती. मिरवणूक मशिदीजवळ आल्यानंतर त्वरित दगडफेक करण्यात आली. |
धर्मांध अल्पवयीन मुलांना केलेल होते छत्रपतींच्या विरोधात लिखाण !काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी छत्रपती शिवराय यांना शिवीगाळ करून तसे लिखाण एका चारचाकी वाहनावर करण्यात आले होते; पण ती मुले अल्पवयीन असल्याने त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले होते. (धर्मांध मुद्दामहून अल्पवयीन मुलांकडून गुन्हे करवून घेतात, हे अजून पोलिसांना समजलेले नाही का ? – संपादक) |
शिवजयंती मिरवणुकीवर मुसलमानांच्या घरातून दगडफेक ! – संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक, जळगावया संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘शिरसोली येथील शिवजयंतीच्या मिरवणुकीवर मशिदीतून नव्हे, तर मुसलमानांच्या घरांतून दगडफेक करण्यात आली आहे. मशिदीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असल्याने तेथून दगडफेक झालेली नाही. दगडफेक करण्याचा पूर्वनियोजित कट होता कि नाही, हा अन्वेषणाचा भाग आहे. ते झाल्यावर याविषयी माहिती मिळेल.’’ |
संपादकीय भूमिका
|