सिद्धार्थनगर (उत्तरप्रदेश) – भारतात अवैधरित्या घुसखोरी करणार्या दोन चिनी नागरिकांना सिद्धार्थनगरममधील बाभनी तिराहे येथून अटक करण्यात आली. यात एका चिनी महिलेचा समावेश आहे. हे दोघे घुसखोर नेपाळमार्गे काकरहवा सीमेवरून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. पकडण्यात आलेला घुसखोर झोउ पुलिन हा चीनमधील सिचुआन येथील, तर घुसखोर महिला युआन युहानमधील हुआंगजिनबाव येथील रहिवासी आहे. आरोपींकडून २ चिनी पारपत्रे, १ नेपाळी ‘टूरिस्ट व्हिसा’, २ भ्रमषभाष, ३ नेपाळी आणि ३ ‘चायनीज सिमकार्ड’, २ लहान बॅगमधील विविध प्रकारची एकूण ९ कार्ड जप्त करण्यात आली आहेत. सिद्धार्थनगर पोलिसांच्या चौकशीत दोघेही चीनचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून कारवाईसाठी न्यायालयात पाठवले.
Two #Chinese Nationals arrested for illegally entering India.
📍 Siddharthnagar Uttar Pradesh
India's stance towards intruders should be such that nobody would dare enter India illegally.#UPPoliceInNews #Nationalsecurity pic.twitter.com/hUoL6Dsog6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 27, 2024
संपादकीय भूमिकाघुसखोरांचे भारतात घुसखोरी करण्याचे धाडस होणार नाही, अशी कारवाई भारताने सर्वच घुसखोरांविरुद्ध करायला हवी ! |