रमजान असल्याने नंदुरबार येथे हिंदूंना घरातील दूरचित्रवाहिनी किंवा अन्य ध्वनी यंत्रे यांचा आवाज बाहेर जाऊ न देण्याविषयी नोटीस !

सामाजिक माध्यमांत प्रसारित झाली आहे नोटीस !

प्रतिकात्मक छायाचित्र

नंदुरबार – येथील सिव्हिल रुगणालयाच्या समोरील घरकुल वसाहतीतील महेंद्र जव्हेरी आणि मनीषा जव्हेरी यांना पोलिसांनी रमजानच्या काळ असल्याने घरात दूरचित्रवाहिनी किंवा अन्य ध्वनी यंत्रे लावून मुसलमानांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या संदर्भात नोटीस पाठवली आहे. या संदर्भात तोंडी तक्रार प्राप्त झाल्याचेही या नोटिशीत म्हटले आहे. ही नोटीस सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात फिरत आहे. नंदुरबार पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी ही नोटीस पाठवली असून त्यात ‘वरील सूचनेचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल’, असे बजावले आहे.

संपादकीय भूमिका

  • पोलीस मुसलमानांना मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात अशी नोटीस कधी पाठवतात का ? ‘हिंदु सहिष्णु असल्यामुळेच पोलीस त्यांच्यावर दबाव आणतात’, असे यावरून लक्षात येते !