हिंदुद्वेष्टे आणि ब्राह्मणद्वेष्टे गायक टी.एम्. कृष्णा यांना कलानिधी पुरस्कार देण्याला आक्षेप !
बेंगळुरू – प्रसिद्ध कर्नाटकी शास्त्रीय गायिका रंजनी आणि गायत्री यांनी टी.एम्. कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या ‘संगीत अकादमी २०२४’च्या परिषदेतून माघार घेण्याचा निर्णय घोषित केला आहे. तसेच या अकादमीच्या अंतर्गत २५ डिसेंबरला निश्चित झालेला त्यांचा कार्यक्रमही त्यांनी रहित केला आहे. संगीत अकादमीने टी.एम्. कृष्णा यांना संगीत कलानिधी पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर त्यांनी आक्षेप घेतला होता. ‘मद्रास म्युझिक अकॅदमी’चे अध्यक्ष एन्. मुरली यांनी रंजनी आणि गायत्री यांच्यावर टीका केली आहे; मात्र सामाजिक माध्यमांवर या दोन्ही गायिकांनी परखडपणे त्यांची बाजू मांडल्याने आणि सनातन धर्माची बाजू घेतल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सौजन्य SoSouth
कर्नाटक शास्त्रीय गायनाची कृष्णा यांनी हानी केली ! – रंजनी आणि गायत्री
१. रंजनी आणि गायत्री यांनी ‘एक्स’वर त्यांचा निर्णय प्रसारित केला आहे. रंजनी आणि गायत्री या द्वयींनी कृष्णा यांच्या नेतृत्वावर तीव्र नापसंती व्यक्त केली. कृष्णा यांनी कर्नाटक शास्त्रीय संगीत जगताची पुष्कळ मोठी हानी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
२. कृष्णा यांनी प्रसिद्ध कर्नाटकी गायक त्यागराज आणि एम्.एस्. शुब्बुलक्ष्मी यांसारख्या प्रतिष्ठित कलाकारांचा अवमान केला आहे. कर्नाटक संगीतात अध्यात्म हा गाभा आहे. कृष्णा यांनी सातत्याने त्याचा अवमान केला आणि कर्नाटकी संगीतकारांना लाजेने मान खाली घालण्यास भाग पाडले.
३. संगीतातील कलात्मकता जोपासणारे, कठोर परिश्रम घेऊन कर्नाटक संगीताला योगदान देणार्या कलाकारांचा त्यांनी अवमान केला आहे.
४. त्यांनी पुढे म्हटले, ‘आम्ही अशा नीतीमूल्यांवर विश्वास ठेवतो जी कला, कलाकार, रसिक, वारसा आणि संस्कृती यांचा आदर करतात. ही मूल्ये पायधळी तुडवून आम्ही या वर्षीच्या परिषदेत सहभागी झालो तर ते आमच्या नीतीमत्तेच्या विरोधी कृत्य असेल.
हिंदुद्वेष्टे आणि ब्राह्मणद्वेष्टे टी.एम्. कृष्णा !
टी.एम्. कृष्णा हे तमिळनाडूतील गायक असून ते जाती निर्मूलनासाठी कार्य करतात. ते द्रविडी विचारसरणीचे आहेत. त्यांनी सुप्रसिद्ध गायिका एम्.एस्. शुब्बुलक्ष्मी हा ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. कर्नाटकी गायनामध्ये हिंदूंच्या देवांवर गीते रचली जातात; मात्र अन्य धर्मियांच्या देवतांच्या संदर्भातही गीते या गायकीमध्ये अंतर्भूत करावीत, असे त्यांचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिकासनातन हिंदु धर्मावर टीका करणारे, तसेच ब्राह्मणद्वेषी विधाने करणारे गायक टी.एम्. कृष्णा यांना विरोध करणार्या रंजनी आणि गायत्री यांचे अभिनंदन ! दक्षिण भारतात आणि त्यातही तमिळनाडूमध्ये सनातन धर्माचा द्वेष करणार्यांच्या विरोधात परखडपणे बोलण्याला धारिष्ट्य लागते. या दोघींनी ते दाखवून धर्माभिमान जोपासला, हे विशेष आहे ! |