अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदार यांचे आवाहन !
वॉशिंग्टन (अमेरिका) – आम्ही अलीकडे हिंदुद्वेष (हिंदूफोबिया) वाढत असल्याचे पहात आहोत. आम्ही ‘कॅलिफोर्निया एस्बी४०३’ (वांशिक भेदभावावर बंदी घालण्याचे विधेयक) देखील पहातो. असे विधेयक केवळ प्रारंभ आहे. मंदिरे आणि हिंदू यांच्यावर जगभरात आक्रमणे होत आहेत. या हिंदुद्वेषाशी लढण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेच्या संसदेत ‘हिंदू कॉकस’ (समविचारी खासदारांचा गट) स्थापन करण्यामागील हे एक कारण आहे, असे विधान ‘हिंदुअॅक्शन’ संघटनेने आयोजित केलेल्या विविध भारतीय अमेरिकी गटांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत अमेरिकेतील भारतीय वंशांचे खासदार श्री ठाणेदार यांनी केले.
१. ठाणेदार पुढे म्हणाले की, प्रथमच अमेरिकी संसदेत ‘हिंदु कॉकस’ स्थापन झाले आहे. लोकांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे धार्मिक स्वातंत्र्य मिळावे, यासाठी आम्ही अनेक उपक्रम घेत आहोत. या भीती, कट्टरता आणि द्वेष यांचा सामना करायला हवा; कारण अमेरिकेत द्वेषाला जागा नसावी. लोकांच्या धार्मिक अधिकारांविरुद्ध द्वेषाला जागा नसावी. त्यामुळे आम्ही सभागृहात यावर लक्ष केंद्रित करत आहोत.
२. ‘अमेरिकन हिंदू ऑर्गनायझेशन’शी संबंधित सुहाग शुक्ला म्हणाले की, हिंदूंना मोठ्या प्रमाणावर हिंदुविरोधी विधाने आणि द्वेष यांचा सामना करावा लागत आहे, विशेषत: महाविद्यालय परिसरांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. गेल्या २ वर्षांत हिंदुविरोधी घटनांमध्ये वाढ झाली आहे.
संपादकीय भूमिकाभारतातील किती खासदार देशातील हिंदूंवरील अत्याचार, द्वेष यांच्याविरोधात लढण्यासाठी बोलतात ? |