Delhi Police Attacked : देहली येथे आदिल याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आक्रमण !

नवी देहली – येथील राजौरी गार्डनच्या रघुबीर नगरमध्ये आदिल नावाच्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलीस गेले असता तेथे उपस्थित आदिलच्या समर्थकांनी पोलिसांवर आक्रमण केले. आदिलच्या समर्थकांकडे लाठ्या आणि चाकू यांसारखी शस्त्रे होती. या आक्रमणात पोलीस गंभीररित्या घायाळ झाले आहेत. पोलिसांचे अतिरिक्त पथक घटनास्थळी पोचल्याने परिसरात शांततेचे वातावरण आहे. पोलिसांनी आक्रमण करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून आदिलसह चौघांना अटक केली आहे. (एखाद्या मुसलमान गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाणार्‍या पोलीस पथकावर धर्मांधांकडून आक्रमण होणे, ही आता नित्याचीच गोष्ट झाली आहे. अशा परिस्थितीत पोलीस गुन्हेगारांना पकडण्यासाठी पूर्वसिद्धता करून का जात नाहीत ? – संपादक)

पोलीस बर्‍याच दिवसांपासून आदिल याचा शोध घेत होते. अशा स्थितीत आदिल राजौरी गार्डनमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळताच ते त्याला अटक करण्यासाठी तेथे गेले. पोलिसांनी आदिलला कह्यात घेताच त्याचे समर्थक शस्त्रे घेऊन बाहेर आले. त्यांनी पोलिसांवर आक्रमण केले. तसेच पोलिसांच्या गाडीची काच फोडली.

संपादकीय भूमिका

मुसलमानांच्या हातून मार खाणारे पोलीस हिंदूंवर मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या !