मुंबई-अहमदाबाद महामार्गावर श्री गौमातेश्वरी आश्रमात होणार धनकुबेर, माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री खाटूराम यांची प्राणप्रतिष्ठा !

प्रभु श्री धनकुबेर

पालघर (मुंबई) : अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील वाडा खडकोना येथे प्रभु श्री धनकुबेर, माता चामुंडादेवी, माता महाकाली, माता सरस्वती आणि श्री खाटूराम यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. साधू-संत, मान्यवर यांच्या उपस्थितीत ११ ते १३ मार्च असे तीन दिवस हा भव्य प्राणप्रतिष्ठा उत्सव चालणार असल्याचे अंबाधाम आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष विनोद सिंग यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रासह गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित रहाणार आहेत. राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील वाडा खडकोना येथे श्री अंबामाता, महादेव, श्रीकृष्ण, श्रीराम, श्री विठ्ठल, श्री परशुराम, श्री लक्ष्मी-नारायण, श्री महालक्ष्मी, श्री संतोषी माता यांची मंदिरे आहेत. याच परिसरात श्री धनकुबेर, माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री खाटूराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ११ आणि १२ मार्च या दिवशी मूर्तीपूजन, भजन उत्सव आणि १३ मार्च या दिवशी प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती मंच, सनातन संस्था, मुस्लिम राष्ट्रीय मंच, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, परशुराम सेवा संघ, परशुराम सेना, ब्राह्मण महासंघ आदी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.