पेशावर (पाकिस्तान) येथील बाँबस्फोटात २ जणांचा मृत्यू

पेशावर (पाकिस्तान) – येथे १० मार्च या दिवशी झालेल्या बाँबस्फोटात २ जणांचा मृत्यू झाला, तर १ जण घायाळ झाला. नसीर बाग रोड येथील बोर्ड बाजारात ही घटना घडली. हा बाँब मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आला होता.

अद्याप कोणत्याही आतंकवादी गटाने या स्फोटाचे दायित्व स्वीकारलेले नाही.

सौजन्य Republic World 

खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी या स्फोटाचा निषेध केला असून पोलिसांकडून या घटनेचा अहवाल मागवला आहे.