पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राची पायाभरणी !

थुथुकुडी (तमिळनाडू) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थुथुकुडी येथे १७ सहस्र कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या नवीन प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी कुलशेखरपट्टणम् येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रोच्या) नवीन प्रक्षेपण केंद्राची पायाभरणीही केली. ‘नवीन प्रक्षेपण संकुल २ वर्षांत पूर्ण होईल’, असे इस्रोचे प्रमुख एस्. सोमनाथ यांनी सांगितले.

सौजन्य : डीडी न्यूज 

इस्रोच्या या नवीन प्रक्षेपण संकुलाची किंमत अनुमाने ९८६ कोटी रुपये आहे. येथून प्रतिवर्षी २४ उपग्रह लॉन्च केले जाऊ शकतात.

या नवीन इस्रो संकुलामध्ये ‘मोबाइल लॉन्च स्ट्रक्चर’ (एम्.एल्.एस्.) आणि ३५ केंद्र यांचा समावेश आहे. यामुळे अवकाश संशोधन क्षमता वाढण्यास साहाय्य होईल.