हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेसाठीची अनुमती नाकारणार्‍या पोलिसांवर खटले प्रविष्‍ट (दाखल) करा !

‘चोपडा (जळगाव) येथे २१ फेब्रुवारी २०२४ या दिवशी समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेच्‍या वतीने होणार्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेसाठीची अनुमती पोलिसांनी नाकारली होती. ‘तेलंगाणातील भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह हे प्रक्षोभक आणि द्वेषमूलक वक्‍तव्‍य करतात’, असे कारण देत पोलिसांनी अनुमती नाकारली. या सभेची अनुमती घेण्‍यासाठी समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेने २५ जानेवारी २०२४ या दिवशी, म्‍हणजे सभेच्‍या २७ दिवस आधीच पोलिसांकडे निवेदन दिले होते; परंतु पोलिसांनी सभेच्‍या २ दिवस आधी अनुमती नाकारली. याविषयी समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेच्‍या वतीने सर्वश्री अनिल वानखेडे आणि राजाराम पाटील यांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या संभाजीनगर खंडपिठामध्‍ये याचिका प्रविष्‍ट केली. न्‍यायमूर्ती मंगेश पाटील आणि शैलेश ब्रह्मे यांच्‍या खंडपिठाने अधिवक्‍त्‍यांचा युक्‍तीवाद लक्षात घेऊन २१ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या सभेला अनुमती नाकारणारा आदेश रहित केला आणि ‘सभेस अनुमती द्या’, असा लिखित आदेश पोलीस अधिकार्‍यांना दिला.’ (२१.२.२०२४)