Indian In UAE : संयुक्त अरब अमिरातमध्ये भारतियांना मिळतो सर्वांत अधिक मान !

पाकिस्तानी नागरिकांनी व्यक्त केली खंत

अबू धाबी –  संयुक्त अरब अमिरात (युएई) आणि भारत यांच्यातील संबंध सध्या पुष्कळ चांगले आहेत. संयुक्त अरब अमिरातमध्ये वास्तव्य करणारे भारतीय छोट्या नोकर्‍या करण्यासह मोठे उद्योग आणि आस्थापने यांचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदही भूषवत आहेत. संयुक्त अरब अमिरातमध्ये रहाणार्‍या भारतियांनी त्या देशाच्या उत्कर्षासाठी केलेल्या कार्यामुळे तेथे भारतियांची चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील संबंध सुधारण्यामागील हे एक प्रमुख कारण आहे. येथे राहणार्‍या विदेशी लोकांमध्ये सर्वाधिक लोकसंख्या भारतियांची आहे. भारतियांनंतर लोकसंख्येमध्ये पाकिस्तानी नागरिकांचा क्रमांक लागतो; पण त्यांना भारतियांसारखा मान मिळत नाही, अशी खंत तेथे वास्तव्य करत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सौजन्य : Real entertainment tv

१.  पाकिस्तानी ‘यू ट्यूबर’ सुहेब चौधरी यांनी संयुक्त अरब अमिरातमध्ये वास्तव्य करणार्‍या पाकिस्तानी नागरिकांनी भेट घेतली आणि त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत एका पाकिस्तानी नागरिकाने सांगितले की, संयुक्त अरब अमिरातमध्ये भारतियांकडे पुष्कळ आदराने पाहिले जाते. तेथील भारतियांच्या मनात पाकिस्तानी लोकांविषयी द्वेष नाही.

२. नवाज नावाच्या दुसर्‍या एका पाकिस्तानी व्यक्तीने सांगितले की, भारतीय त्यांच्या शिक्षण, लेखन आणि अन्य कौशल्य यांसाठी ओळखले जातात; पण पाकिस्तान्यांमध्ये हे गुण नाहीत.

३. ‘पाकिस्तानातील काही भ्रष्ट लोकांनी देशाचे नाव खराब केले आहे. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातमध्ये लोक पाकिस्तानी नागरिकांना नोकर्‍या देऊ इच्छित नाहीत’, असे एकाने म्हटले.

४. ‘भारतीय लोक उच्च शिक्षित आहेत. ते त्यांच्या लोकांना साहाय्य करतात. त्यांचे सरकारही त्यांना पाठिंबा देते’, असेही काही पाकिस्तानी नागरिकांनी सांगितले.