Rahul Gandhi in Kashi : राहुल गांधी यांनी घेतले श्री काशी विश्‍वनाथाचे दर्शन !

  • काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ !

  • भारत हा द्वेषाचा नाही, तर प्रेमाचा देश आहे ! – राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी

वाराणसी (उत्तरप्रदेश) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ ३५ व्या दिवशी वाराणसीत पोचली. या वेळी त्यांनी श्री काशी विश्‍वनाथाचे दर्शन घेतले. नंतर त्यांची जाहीर सभाही झाली. गांधी म्हणाले की, देशात पसरत असलेला द्वेष आणि हिंसाचार अन्यायामुळे आहे. शेतकरी तरुणांवर सामाजिक आणि आर्थिक अन्याय होत आहे.

गांधी पुढे म्हणाले, ‘या यात्रेच्या संपूर्ण प्रवासात मला कुठेही द्वेष दिसला नाही. भारत हा द्वेषाचा नाही, तर प्रेमाचा देश आहे. सर्वांनी एकजुटीने काम केले, तरच देश सशक्त होईल. ४ सहस्र किलोमीटरच्या ‘भारत जोडो यात्रे’त मी शेतकरी, कामगार, छोटे व्यापारी आणि महिला यांची भेट झाली. या सर्वांनी मला त्यांच्या व्यथा सांगितल्या. देशातील अब्जाधीशही गरीबांइतकाच कर भरत आहेत. यामुळेच आम्ही ‘भारत जोडो यात्रे’त न्याय हा शब्द जोडला. देशात २ भारत आहेत. एक अब्जाधीश आहे आणि दुसरा गरीब आहे. सर्व प्रसारमाध्यमे ही उद्योजक गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांची आहेत. शेतकरी, कामगार आणि गरीब यांच्याविषयी ते कधीच सहानुभूती दाखवणार नाहीत.

संपादकीय भूमिका

  • श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे पाठ फिरवणार्‍या, किंबहुना त्याला विरोध करणार्‍या राहुल गांधी यांच्यावर श्रीरामाचेच भक्त असलेले श्री काशी विश्‍वनाथ कधी तरी कृपा करतील का ? यामुळेच जनतेनेही त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे !
  • काँग्रेसने गेल्या ७५ वर्षांत केवळ हिंदुद्वेषच जोपासला, त्याविषयी गांधी काहीच का बोलत नाहीत ?