दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण नाही !; २ बांगलादेशींना तळोजा येथून अटक !

धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण नाही !

मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली !

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने ‘धनगर समाजाला अनुसूचित जाती (एस्.टी.) प्रवर्गातून आरक्षण मिळावे’, ही मागणी फेटाळून लावली आहे. या संदर्भात समाजाकडून प्रविष्ट करण्यात आलेल्या अनेक याचिकाही फेटाळण्यात आल्या. त्यामुळे आता या समाजाला केवळ सर्वोच्च न्यायालयातच दाद मागता येईल.


२ बांगलादेशींना तळोजा येथून अटक !

२५ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केल्याचे उघड

तळोजा – येथील खिडूकपाडा भागात अवैधपणे वास्तव्यास असलेल्या २ बांगलादेशी नागरिकांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. बेलाल सलाउद्दीन मोल्ला (वय ३३ वर्षे) आणि रसूल जलील शेख (वय ३३ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी २५ वर्षांपूर्वी भारतात त्यांच्या आई-वडिलांसह घुसखोरी केली होती. या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका : २५ वर्षांनंतर घुसखोर सापडतात, हे देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लज्जास्पदच !