Attack Over Indians : (म्हणे) ‘आक्रमणे रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत !’ – अमेरिका

अमेरिकेत भारतियांवरील आक्रमणांचे प्रकरण

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी

वॉशिंग्टन (अमेरिका) – गेल्या महिन्याभरात अमेरिकेत भारतीय वंशांच्या नागरिकांवर आक्रमणे करण्यात आली आहेत. यांत ४ भारतीय, तर ३ भारतीय वंशाच्या लोकांचा मृत्यू झाला, तसेच काही जण घायाळ झाले. या संदर्भात व्हाईट हाऊसमधील अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांना पत्रकार परिषदेत प्रश्‍न विचारण्यात आला. त्या वेळी ते म्हणाले की, अमेरिकेत नक्कीच वंश, लिंग, धर्म किंवा हिंसाचार यांचे कोणतेही कारण अजिबात मान्य नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांचे प्रशासन ही आक्रमणे रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झालेला असतांना पहिला मृत्यू झाला, त्याच वेळी अमेरिकेने गांभीर्याने प्रयत्न केले असते, तर इतरांचा मृत्यू टाळता आला असता. आताही अमेरिका या संदर्भात काही करत आहे, असे वाटत नाही !
  • अमेरिका भारतासाठी मित्र नाही, तर संधीसाधू आणि स्वार्थी आहे, इतकेच तिच्याविषयी लक्षात ठेवायला हवे !