Stone Pelting By TelanganaChurch : रंगारेड्डी (तेलंगाणा) येथे रस्ता रुंदीकरणाला चर्चचा विरोध – चर्चमधून गावकर्‍यांवर आक्रमण !

  • दगड आणि विटा यांद्वारे केला मारा !

  • गावकर्‍यांनीही दिले प्रत्युत्तर !

  • १८ जण घायाळ, तर ११ जणांना अटक !

  • जमावबंदी आदेश लागू !

भाग्यनगर (तेलंगाणा) – भाग्यनगर जिल्ह्याला लागून असलेल्या रंगारेड्डी जिल्ह्यातील १३ फेब्रुवारीची ही घटना असून येथील जनवाडा गावात रस्ता रुंदीकरणाचे काम चालू होते. त्याला तेथील मेथोडिस्ट चर्चमधील लोकांनी विरोध केला. या वेळी चर्चमधून गावकर्‍यांवर दगड आणि विटा यांचा मारा होऊ लागला. यामुळे संतप्त झालेल्या गावकर्‍यांनीही त्यास प्रत्युत्तर देत चर्चमध्ये तोडफोड केली. या आक्रमणात दोन्ही बाजूंचे एकूण १८ जण घायाळ झाले. पोलिसांनी या प्रकरणी ११ जणांना अटक केली आहे.  वाढता तणाव पहाता तेथे एका आठवड्यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. हा विषय चर्चशी संबंधित असल्याने राजकीय पक्षांनी चर्चची बाजू घेण्यास आरंभ केला आहे.

आक्रमणात चर्चचा क्रॉसही तोडण्यात आला !

गावकर्‍यांनी केलेल्या आक्रमणात चर्चमधील क्रॉसही तोडण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी चर्चने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ‘एस्.सी. एस्.टी.’, तसेच अन्य कायद्यांच्या अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. (ख्रिस्ती हिंदूंचे धर्मांतर केल्यानंतरही त्यांची कागदोपत्री जात पालटून घेत नाहीत. अशा आक्रमणांच्या वेळी ख्रिस्ती झालेल्यांना वाचवण्यासाठी ही पळवाट काढली जात आहे, हेच यातून लक्षात येते ! – संपादक)

कायदा-सुव्यवस्था हातात घेऊन हिंसाचार करणे, हे चुकीचेच आहे; परंतु जे ख्रिस्ती ‘हिंदु देवता त्यांच्या मंदिरांनाही वाचवू शकत नाहीत’, असे विधान करून हिंदूंचा बुद्धीभेद करू पहातात, त्यांना आता कुणी ‘या घटनेच्या वेळी येशू चर्चचे रक्षण करण्यास सक्षम नव्हते का ?’ असा प्रश्‍न विचारला, तर चालेल का ? – संपादक 

मागासवर्गीय हिंदूंचा द्वेष करणारा बसप !

तेलंगाणा बसपचे अध्यक्ष डॉ. आर्.एस. प्रवीण कुमार यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सांगितले की, २०० हून अधिक लोकांनी चर्चवर आक्रमण केले. चर्चमधील लोकांना लोखंडी रॉड आणि काठ्या यांनी मारहाण करण्यात आली. (गावकरीसुद्धा अनुसूचित जाती-जमातीचे असले, तरी बसप या प्रकरणी ख्रिस्त्यांची बाजू घेत आहे. यातून बसपचे ख्रिस्तीप्रेम आणि मागासवर्गीय हिंदूंप्रती असलेला द्वेषच प्रकट होतो, हे जाणा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • हे आहे चर्चचे खरे स्वरूप ! समाजसेवेच्या नावाखाली ख्रिस्ती काय करतात ?, हे तर जगजाहीर आहेच. आता अशा घटनांतून चर्चही मशिदींप्रमाणे दगड जमवून ठेवते आणि वेळ आल्यावर हिंदूंवर आक्रमण करते, हे लक्षात घ्या !
  • ‘बीबीसी’, ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ आदी पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमे, तसेच ‘अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल’, ‘युरोपीयन युनियन’ यांसारख्या संघटनांनी या घटनेवरून आता भारताला जाब विचारला, तर आश्‍चर्य वाटू नये !