जिल्ह्यात ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन !

पोलिसांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

यवतमाळ, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अनुक्रमे ६ आणि ८ फेब्रुवारी या दिवशी देण्यात आले.

पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उपपोलीस अधीक्षक मनोहर पाटील यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी त्यांनी निवेदनाची तात्काळ नोंद घेत संबंधितांना सूचना निर्देशित केल्या. ‘‘समाजव्यवस्था उत्तम रहावी यासाठी तुमचे चांगले प्रयत्न आहेत’’, असे ते या वेळी म्हणाले.

पोलिसांना निवेदन देतांना पतंजली योग पिठाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिनेश राठोड, सनातन संस्थेचे सुधाकर कापसे, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक मंगेश खांदेल, दत्तात्रय फोकमारे उपस्थित होते.