वेदना न्यून करण्यासाठी उपयुक्त उपचार – ‘बिंदूदाबन’ उपचारपद्धत !

खेड येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ उत्साहात पार पडले !

खेड –  भीषण आपत्काळाच्या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि अन्य संतांनी आधीच सांगून ठेवले आहे. आपत्काळ कसा असू शकतो ? हे कोरोना महामारीत बहुतेकांनी अनुभवले. आपत्काळात आधुनिक वैद्य उपलब्ध होतीलच असे नाही. त्या काळात रुग्णांच्या वेदना न्यून करता येण्यासाठी ‘बिंदूदाबन’ उपचारपद्धत वापरता यावी यासाठी खेड येथे ५ ते ७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ३ दिवसांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी उपस्थित शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.

या शिबिरात दापोली, खेड, लोटे, चिपळूण आणि सावर्डे येथील २८ साधकांनी शिबिराचा लाभ घेतला आणि स्वत:च्या भागातील इतर साधकांना ही उपचारपद्धत शिकवण्याचे ध्येय घेतले. मणका, गुढघा, हात-पाय तसेच पोटाच्या संबंधित विविध विकार असलेल्या ६२  रुग्णांवर डॉ. दीपक जोशी यांनी उपचार केले. रुग्णांवर उपचार केल्यावर ‘त्यांनी बरे वाटल्याचे सांगितले.’

‘उपाशीपोटी रुग्णांची तपासणी कशी करावी ?’, हाता-पायांवरील विविध बिंदू , तसेच त्यांचे कार्य, कोणत्या आजारावर कोणता बिंदू दाबावा ?, बिंदूदाबनाची पद्धत कशाप्रकारे कार्य करते ? अशा विविध विषयांवर डॉ. दीपक जोशींनी मार्गदर्शन केले.

डॉ. दीपक जोशी यांनी बिंदूदाबनाचे सांगितलेले महत्त्व !


१. बिंदूदाबन उपचारपद्धतीमध्ये रोगाचे निदान आणि उपचार करण्यासाठी विशिष्ट बिंदूंचा वापर केला जातो. यामध्ये केवळ हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदू दाबून रोगाचे निदान आणि उपचार केले जातात !

२. बिंदूदाबन उपचारपद्धत सहज आणि सोपी आहे जी आपण कधीही, कुठेही करून रुग्णाच्या वेदना तात्काळ न्यून करता येतात !