पुणे येथे पैशाच्या वादातून दुकानदारावर गोळ्या झाडून सराफा व्यावसायिकाची आत्महत्या !

असुरक्षित पुणे शहर !

पुणे – येथे पुन्हा सराफा व्यावसायिकावर गोळीबार झाला आहे. औंध भागात पैशाच्या वादातून अनिल ढमाले या सराफा व्यावसायिकाने आकाश जाधव या दुकान मालकावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर अनिल ढमाले हा रिक्शातून चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याकडे निघाला आणि त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. या प्रकरणी टेंपोचालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.